ट्विटरपाठोपाठ फेसबुकने केली कर्मचारी कपात, अकरा हजार कर्मचाऱयांना दाखवला बाहेरचा रस्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ट्विटरनंतर आता फेसबुकची मालकी असलेल्या मेटा कंपनीने मोठय़ा प्रमाणात कर्मचारी कपात केली आहे. मेटाने तब्बल 11 हजारांहून अधिक कर्मचाऱयांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. कंपनीच्या महसुलात सातत्याने घट होत असल्याने पंपनीने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कंपनीच्या 18 वर्षांच्या इतिहासातली ही सर्वात मोठी कर्मचारी कपात आहे.

मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी बुधवारी एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हणाले, ‘मी मेटाच्या इतिहासातील सर्वात कठीण निर्णय घेत आहे. मी माझ्या टीमचा सुमारे 13 टक्के भाग कमी करण्याचा आणि आमच्या 11 हजारांहून अधिक प्रतिभावान कर्मचाऱयांना कंपनीमधून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही खर्चात कपात करून अधिक कार्यक्षम कंपनी बनण्यासाठी अनेक अतिरिक्त पावले उचलत आहोत.’ मेटाकडे व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकची मालकी असून सप्टेंबर अखेरपर्यंत मेटामध्ये 87 हजार कर्मचारी होते. गेल्याच आठवडय़ात ट्विटरचे नवे मालक एलन मस्क यांनी आपल्या पंपनीमधील 50 टक्के म्हणजेच 7500 कर्मचाऱयांना बाहेरचा रस्ता दाखवला होता.