
मालदीवची राजधानी असलेल्या माले येथे गॅरेजला आग लागून मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 9 हिंदुस्थानीयांचा समावेश असून 1 बांग्लादेशी नागरिकाचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीला लागलेल्या आगीमुळे वरच्या मजल्यावरुन 10 मृतदेह सापडले आहेत. आग इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या कारच्या गॅरेजला लागली होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यास चार तास लागले. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मृतकांमध्ये 9 हिंदुस्थानी आणि एका बांग्लादेशी नागरिकाचा समावेश आहे. मालदीवच्या हिंदुस्थानी उच्चायोगाच्या माले येथील दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच हिंदुस्थानी दूतावासाने मालदीव सरकारच्या संपर्कात असल्याचे सांगितले आहे. तसेच मालदीव सरकारच्या एका उच्च अधिकाऱ्याने सांगितले की, पोलीस मृतकांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.
मालदीव सरकारच्या एका उच्च अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस मृतदेहांची ओळख पटवत आहेत. मालदीवच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ट्वीट करुन सांगितले की माले येथे लागलेल्या आगीत नुकसानग्रस्त नागरिकांसाठी एक स्टेडिअमवर बचाव केंद्र तयार करण्यात आलं आहे. पिडीतांच्या मदतीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही 10 मृतदेह बाहेर काढले आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी सुमारे चार तास लागले. 9 हिंदुस्थानी आणि एका बांग्लादेशी नागरिकाचा समावेश असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.


























































