
भांडण मिटवण्यासाठी बोलावून चाकूने भोसकल्याची घटना लातूरच्या शहरातील इस्लामपूरा भागात घडली. या प्रकरणी दोघांविरुध्द विवेकांनद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या मारहाण प्रकरणी हैदर मजीद पठाण रा.इस्लामपूरा यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, अजहर शौकत शेख आणि त्याच्या सोबत्याने संगनमत करुन फिर्यादीस मागील झालेले भांडण मिटवून घेण्यासाठी बोलावून घेतले. त्यांनतर मागील भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. चाकूने फिर्यादीच्या हातावर वार केले तसेच पोटात चाकूने भोसकले, पाठीतही चाकूचा वार करुन जखमी केले. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तर जीवे मारु अशी धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
























































