
किरकोळ वादाच्या रागातून टोळक्याला बोलावून घेत तरूणावर खुनी हल्ल्याचा प्रयत्न करीत आठ ते नउजणांनी वारजेतील आकाशनगर परिसरात धुडगूस घातला. हातातील कोयते हवेत फिरवून दहशत माजविली. ही घटना 27 नोव्हेंबरला रात्री आठच्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी पप्या उर्फ वैभव उकरे याच्यासह इतर आठ ते नउ साथीदारांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजीत देशमुख (वय 31, रा. वारजे ) यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
च
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिजीत आणि पप्या ओळखीचे आहेत. मार्च 2022 मध्ये पप्या हा दारू पिण्यासाठी अभिजीत यांच्या भावाच्या घरासमोर बसला होता. त्यावरून त्यांच्यात वाद झाले होते. त्याच वादातून 27 नोव्हेंबरला पप्याने साथीदारांना बोलावून घेत अभिजीतवर खुनी हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यांच्या दुचाकीवर दगड मारून नुकसान केले. पप्पुभाई हा इथला भाई आहे, असे म्हणत हातातील कोयते हवेत उडवून दशहत निर्माण केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जर्नादन होळकर तपास करीत आहेत.





























































