‘शाईफेक करणे योग्य नाही, पण शिक्षणमंत्र्यांनी…’, पवारांनी चंद्रकांत पाटलांचे कान टोचले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजप नेते आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे सध्या राज्यातील वातावरण तापले आहे. विरोधी पक्ष आक्रमक झालेला असतानाच पिंपरी चिचवडमध्ये एका तरुणाने चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केली, यामुळे हा वाद आणखी चिघळला. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. शाईफेक करणे योग्य नसल्याचे म्हणत पवारांनी चंद्रकांत पाटील यांचेही कान टोचले आहेत.

शरद पवार यांचा आज 82वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले की, शिक्षणमंत्र्यांवर झालेल्या शाईफेकीच्या प्रकरणाचे मी समर्थन करणार नाही. हे योग्य नसून विरोधकांवर टीका करण्याचा अधिकार जसा त्यांच्याकडे आहे, तसाच सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याचा अधिकारी आपला (विरोधकांचा) आहे. मात्र टीका करणे याचा अर्थ कोणाच्या अंगावर शाईफेक करणे असा नव्हते. त्याचे समर्थन होऊ शकत नाही, करणार नाही. मात्र चंद्रकांत पाटील यांनी नेमके काय केले याचा उल्लेख याआधीच्या वक्त्यांनी केलेला आहे. शिक्षणमंत्र्यांनी जे विधान केले ते केले नसेत तर कदाचित हा प्रकार घडला नसता.

चंद्रकांत पाटील यांनी फुलेंचा, आंबेडकरांचा, भाऊराव पाटलांचा उल्लेख केला आणि मग भीक हा शब्द वापरला. हा शब्द कोणालाही आवडणार नाही. फुलेंचे आणि आंबेडकरांचे संपूर्ण जीवन देशाला माहिती आहे. कर्मवीरांनी आपले जीवन ज्ञानदानासाठी घालवले. पैसे नसतानासुद्धा आपल्या पत्नीच्या गळ्यातील दागिने विकले, पण शिकणाऱ्या मुलांचे दोन वेळचे जीवन थांबू दिले नाही, असे पवार म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संस्थेचे ब्रिद आहे ‘कमवा आणि शिका’, भिक मागा असे नाही. या संस्थेचा मी गेल्या 50 वर्षांपासून अध्यक्ष आहे. तिथे आम्ही कधी राजकारण आणत नाही. अशा संस्थापकांबाबत कर्मवीर भाऊरावांबाबत, फुलेंबाबत, आंबेडकरांबाबत बोलत असताना भीक मागणे असा शब्द वापरला नसते तर बरे झाले असते, असे खडेबोलही पवारांनी सुनावले.

ठीक आहे झाले ते झाले परंतु लगेच गिरणी कामगारांचा मुलगा आहे म्हणून दाखवले. मंत्रीमंडळात मंत्री होतात. अध्यक्ष होतात आणि आताही मंत्री आहात आणि सामान्य कुटुंबातील व्यक्ती ही सत्तेपर्यंत पोचलेले उदाहरण तुमचेच आहे का? असा सवालही शरद पवार यांनी करताना कितीतरी लोक असे आहेत. त्यांच्यावर टिका टिपण्णी झाली परंतु त्यांनी हा कांगावा कधी केला नाही हे दुर्दैव आहे. हे कधी घडलं नसते तर चांगले झाले असते मी याचे समर्थन करत नाही असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.