बिरेंद्र सराफ राज्याचे नवे महाधिवक्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आशुतोष पुंभकोणी यांचा राजीनामा मंत्रिमंडळाने स्वीकारल्यानंतर सरकारने राज्याच्या महाधिवक्तापदी ज्येष्ठ विधिज्ञ डॉ. बिरेंद्र सराफ यांची नियुक्ती केली आहे. राज्य मंत्रिमंडळाने सराफ यांचे नाव सुचविले असून ते राज्यपालांच्या मंजुरीनंतर पदभार स्वीकारतील.

सराफ गेल्या 25 वर्षांपासून मुंबई उच्च न्यायालयात वकिली करत आहेत. मुंबईतील शासकीय विधी महाविद्यालयातून त्यांनी वकिलीची पदवी मिळविली असून सलग 3 वर्षे ते विद्यापीठाचे टॉपर होते. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या हाताखाली त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले आहे. दरम्यान, पुंभकोणी यांनी सप्टेंबर महिन्यात राजीनामा दिला होता; मात्र मंत्रिमंडळाने तो 31 डिसेंबर 2022पर्यंत तात्पुरता स्थगित ठेवला होता. आज अखेर पुंभकोणींचा राजीनामा मंजूर करण्यात आला.