चंद्रकांत पाटलांवर शाई फेकणाऱ्या तिघांना जामीन मंजूर,समर्थकांकडून आरोपीचे जल्लोषात स्वागत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गेल्या आठवड्यात शाईफेक करण्यात आली होती. त्याप्रकरणी समता सैनिक दलाचे संघटक मनोज घरबडे, सदस्य धनंजय इजगज आणि वंचित बहुजन आघाडीचे सचिव विजय ओव्हाळ या तीन जणांना अटक करण्यात आली होती. त्या आरोपींना पिंपरी न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला आहे.

तुरुंगातून बाहेर येताच या आरोपींच्या समर्थकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. त्या तिघांनाही हार घालण्यात आले होते तसेच त्यांची वाजच गाजत मिरवणूक काढण्यात आली होती. तसेच यावेळी या आरोपींनी मोठ मोठ्या घोषणाही दिल्या.

कर्मवीर भाऊराव पाटील, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले या थोर पुरुषांचा घोर अवमान करणाऱ्या उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर 10 डिसेंबर रोजी शाईफेक करण्यात आली.