12 वर्षांच्या तपश्चर्येला यश!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य मंत्रिमंडळाने लोकायुक्त कायद्यातील सुधारणा स्वीकारल्याने भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाच्या 12 वर्षांच्या तपश्चर्येला यश मिळाल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली आहे.

हिवाळी अधिवेशनात लोकायुक्त कायदा सुधारणा विधेयक विधिमंडळात मांडण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यासंदर्भात अण्णा हजारे म्हणाले, ‘‘सुधारित लोकायुक्त कायदा क्रांतिकारक आहे. पूर्वीचे लोकायुक्त नामधारी होते. त्यांना भ्रष्टाचाराच्या तक्रारींची चौकशी करण्याची तरतूद कायद्यात नव्हती. नव्या कायद्यात सर्व अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, मंत्री व मुख्यमंत्र्यांच्या चौकशीचे अधिकार आहेत. त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल,’’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.