तुम्ही आमच्याशी एवढे निर्दयी कसे वागू शकता? उद्धव ठाकरे यांचा दीपक केसरकरांना सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा अखेरचा टप्पा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिंधे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांना थेट सवाल केला आहे. ‘तुम्हाला एवढं मोठं केलं…आम्ही तुमचं काय वाईट केलंय? तुम्ही आमच्याशी एवढे निर्दयीपणे कसे वागू शकता’ असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केसरकर यांना केला.

गुरुवारी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची दीपक केसरकर यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यानच उपसभापतींच्या दालनात उद्धव ठाकरे आणि दीपक केसरकर हे आमने सामने आले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी केसरकर यांना थेट प्रश्न विचारले.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी, ‘तुम्हाला एवढं मोठं केलं…आम्ही तुमचं काय वाईट केलंय? तुम्ही आमच्याशी एवढे निर्दयीपणे कसे वागू शकता? असे प्रश्न दीपक केसरकर यांना विचारले. त्यावेळी दीपक केसरकर यांची या प्रश्नांमुळे भंबेरी उडाली. त्यांच्याकडे प्रश्नांची उत्तरं नसल्यामुळे केसरकर यांना एकही शब्द उच्चारता आला नाही. यानंतर विधिमंडळ परिसरात याच प्रश्नांची चर्चा रंगली होती.