
आंध्र प्रदेशच्या एका प्रेमीयुगलाला बाईकवर रोमान्स करणं चांगलच महागात पडलं आहे. या युगुलाचा बाईकवर मिठी मारण्याचा व्हिडीओ वायरल झाल्यानंतर पोलिसांनी या युगुलाला अटक केली आहे.
आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम येथील ही घटना आहे. सोशल मिडीयावर एक प्रेमीयुगुलाचा धावत्या बाईकवर रोमान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत होता. या व्हिडीओत एक तरुण बाईक चालवत आहे आणि त्याच्या पाठिमागे बसलेली तरुणी धावत्या बाईकच्या टाकीवर त्याला मिठी मारुन बसल्याचे त्यामध्ये दिसत आहे. दोघांच्या या रोमान्सचा व्हिडीओ कोणीतरी बनवून तो सोशल मीडियावर अपलोड केला होता. त्यावेळी नेटकऱ्यांनी या युगुलाला चांगलेच ट्रोल केले होते. अशाप्रकारचे स्टंट जीवावरही बेतू शकतात.
व्हायरल होणारा हा व्हिडीओ आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणममधील स्टील प्लांट रोडवरील आहे. हा व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागला होता. त्यांनी या व्हिडीओची पडताळणी करुन या युगुलाला शोधून काढले आणि दोघांनाही अटक केले आहे. अजय कुमार (21) आणि शैलजा (19) अशी त्यांची नावे असून
విశాఖలో లవర్స్ ఓవర్ యాక్షన్. స్టీల్ ప్లాంట్ మెయిన్ రోడ్డుపై పట్టపగలు బరితెగింపు. హెల్మెట్ లేకుండా యువకుడు డ్రైవింగ్. కాలేజ్ యూనిఫామ్ ధరించి విద్యార్థిని వికృత చేష్టలు చూసి నివ్వెరపోయిన స్థానికులు. #AndhraPradesh #Visakhapatnam #Vizag pic.twitter.com/i2dGgHKElg
— Vizag News Man (@VizagNewsman) December 29, 2022
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निष्काळजीपणाने वाहन चालवण्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही तरुणांच्या पालकांना बोलावून पोलीसांनी समज दिला आहे.


























































