मकरंद अनासपुरे छोटय़ा पडद्यावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोनी मराठी वाहिनीवर आता अजून एक वेगळी मालिका पाहायला मिळणार आहे. ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’, असं या मालिकेचं नाव असून यात मकरंद अनासपुरे प्रमुख भूमिकेत आहेत. दिनकर त्र्यंबक गुळस्कर असं त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव असून पोस्ट ऑफिसच्या पार्सल विभागात गेली 17 वर्षे ते कार्यरत आहेत.

पारगावमधले हे पोस्ट ऑफिस आहे. मकरंद अनासपुरे यांच्यासोबत या मालिकेत विनोदवीर समीर चौघुले, पृथ्वीक प्रताप, प्रभाकर मोरे, इशा डे, दत्तू मोरे पाहायला मिळणार आहेत. हलकी फुलकी कॉमेडीचे निरनिराळे विषय घेऊन ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ ही मालिका 5 जानेवारीपासून गुरुवार ते शनिवार रात्री 10 वाजता प्रसारित होणार आहे. अवघ्या महाराष्ट्राला ही हास्याची मनी ऑर्डर नक्कीच आवडेल, यात शंका नाही.

मी इतकी वर्ष टेलिव्हिजनवर अनेक वेगवेगळे कार्यक्रम केले. मागच्या काही वर्षांमध्ये मी फिक्शन मालिकेत काम केलं नव्हतं. सचिन गोस्वामी, सचिन मोटे यांचीदेखील ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’ ही पहिली दैनंदिन मालिका आहे आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातील चांगले कलाकार या मालिकेत आहेत. अनेक तरुण कलाकार आमच्याबरोबर आहेत. त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव वेगळा आणि विलक्षण आहे.

– मकरंद अनासपुरे