14 जानेवारीपर्यंत ‘या’ राज्यातील शाळा बंद, जाणून घ्या कारण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशात थंड वातावरणाबरोबरच शीतलहरींचा प्रभाव वाढणार असल्याने हवामान विभागाने रेड अॅलर्ट जारी केले आहे. त्यानंतर राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने आठवी पर्यंतच्या शाळांना 14 जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. शीतलहरीमुळे उत्तरप्रदेशातील सर्व सरकारी, खासगी शाळा बंद ठेवण्याचे निर्देष दिले आहेत.

उत्तरप्रदेशच्या रेड अॅलर्टवर असलेल्या 60 जिल्ह्यांमध्ये पश्चिम उत्तर प्रदेशातील जवळपास सर्व जिल्हे आहेत. तर पूर्वांचलमधील बहुतांश जिल्ह्यांचाही यात समावेश आहे. इथल्या हवामान विभागाने दोन दिवस रेड अॅलर्ट दिला आहे. त्यानंतर राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने आठवी पर्यंतच्या शाळांना 14 जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. शीतलहरीमुळे उत्तरप्रदेशातील सर्व सरकारी, खासगी शाळा बंद ठेवण्याचे निर्देष दिले आहेत.

याशिवाय सर्व बोर्डाच्या माध्यमिक विद्यालयामध्ये नववीपासून बारावीपर्यंत शाळा आणि महाविद्यालयांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे. शाळा आणि महाविद्यालयाचे संचालन सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंतच भरेल. जारी केलेल्या नोटीसमध्ये लिहीले आहे की, इंटरमिजिएट कॉलेज आणि हायस्कूलशी संलग्न प्राथमिक आणि कनिष्ठ हायस्कूलपर्यंतचे वर्गही 14 जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी घेतले जाणार नाहीत. याप्रकरणी माध्यमिक शिक्षा निदेशक महेंद्र देव यानी जारी केलेल्या निर्देशात तर शीतलहरींमुळे नववी ते बारावीच्या विद्यारर्थ्यांच्या वेळेत 14 जानेवारी पर्यंत बदल करण्यात आला आहे.