29 हजार 171 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेल्या एकूण 6 लाख 62 हजार 163 विद्यार्थ्यांपैकी 29 हजार 171 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. या परीक्षेत एकूण 1 लाख 26 हजार 505 विद्यार्थी पात्र ठरले असून पाचवीचा निकाल 23.90 तर आठवीचा निकाल 12.53 टक्के लागला आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 31 जुलै रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी अंतरिम निकाल प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यावरील आक्षेपांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात आला. तीन लाख 82 हजार 697 विद्यार्थ्यांनी पाचवीची परीक्षा दिली. पैकी 91 हजार 474 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आठवीची परीक्षा दोन लाख 79 हजार 466 विद्यार्थ्यांनी दिली, पैकी 35 हजार 34 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाळांना विद्यार्थ्यांचा निकाल लॉग इनमधून आणि पालकांना पाल्यांचा निकाल वेबसाइटवर बघता येणार आहे.