
जालना जिल्ह्यातील मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून काही ठिकाणी अवकाळी पावसाने पिके आडवे केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.
जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यासह डोणगाव परिसरामध्ये यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. पण शेतकऱ्यांनी पुन्हा कंबर कसून मशागत करून शेती पेरण्यासाठी बी बियाणे, रासायनिक खते, पैशाची उसनवारी करून मोठ्या आशेने रब्बी पिकांची पेरणी केली. गेल्या दोन ते तीन दिवसापासून ढगाळ वातावरण व गारवा निर्माण झालेला असताना अचानक बुधवारी 4 जानेवारी रोजी रात्री दहा ते एक पर्यंत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने त्यामध्ये वादळी वारेही मोठया प्रमाण होते. धुई देखील असल्याने हरबरा सह अन्य फळ पिकांना द्राक्ष, डाळिंब या पिकांना मोठा फटका बसला असून शेतकऱ्यासमोर संकट मागे संकट सुरूच आहे.
अगोदर खरीप पिकांचे नुकसान झाले असून त्यामध्ये कापूस मका सोयाबीन आधी पिकांची मोठी नुकसान झाले होते.यामध्ये शासन नुसतेच बघ्याची भूमिका घेत असून विमा कंपन्यांनी देखील तुटपुंजा परतावा देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी अतिवृष्टी मुळे कापूस पीक गेल्याने रब्बी पिकांची मोठ्या प्रमाणात उत्पन्नात वाढ व आर्थिक मदत होईल या आशेने खर्च करण्यात आले होता.मात्र या आशेवर निसर्गाने पूर्ण पाणी फिरवले आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसापासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते बुधवारी रात्री उशिरा पावसाने सुरुवात केल्यामुळे रब्बी पिकांचे मोठी प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांची झाली आहे,अवकाळीने हतबल केलं असल्याचे डोणगाव येथील शेतकरी योगेश पुंगळे यांनी सांगितले.
पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
यंदा नैसर्गिक आपत्ती सुरूच असून अगोदर खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना त्यामध्ये मक्का कापूस सोयाबीन हिरवी मिरची टोमॅटो अन्य पिकांचे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांनी स्वत:ला सावरत पुन्हा नव्या उमेदीने उभे राहत बी- बियाणे रासायनिक खते व औषध फवारणी करण्याकरिता पैशाची जुळवाजुळवी करून रब्बी पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी करण्यात आली होती, गेल्या दोन ते तीन दिवसापासून ढगाळ वातावरण निर्माण झालेले असताना बुधवारी रात्री दहा सुमारास अवकाळी पावसाने पडला. त्यामध्ये मका,गहूं, ज्वारी, हरभरा सह अन्य पिकांची मोठया प्रमाणात हानी झाली. असे डोणगाव येथील शेतकरी ज्ञानेश्वर घोडके यांनी सांगितले.
























































