सेनेगलमध्ये दोन बसची समोरा समोर धडक, 40 जण ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सेनेगल देशात दोन बसची समोरासमोर धडक झाल्याने तब्बल 40 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 80 हून अधिक प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सेनेगलमधील कॅफ्रीन भागातील ग्निवी गावातील राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात घडला आहे. एका बसचे टायर पंक्चर झाल्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. परिणामी पहिली बस समोरुन येणाऱ्या दुसऱ्या बसवर आदळली. या भीषण अपघातानंतर घटनास्थळी रक्तामासाचा सडा पडला होता. या अपघाताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या घटनेनंतर येथील राष्ट्राध्यक्ष मॅकी शाल यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.