
भरधाव मोटार चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरूण ठार झाला. हा अपघात 8 जानेवारीला रात्री तीनच्या सुमारास कोथरूडमधील सुंदरनगरी सोसायटीसमोर घडला. अनिकेत अशोक गायकवाड (25) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अमित गायकवाड (31) यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत 8 जानेवारीला मध्यरात्री तीनच्या सुमारास दुचाकीवरून घरी चालले होते. त्यावेळी कोथरूड परिसरात मोटार चालकाने त्याला धडक दिली. त्यामुळे खाली पडून गंभीररित्या जखमी झाल्याने अनिकेतचा मृत्यू झाला. याप्रकरणी कोथरूड पोलिस तपास करीत आहेत.


























































