चहा देण्यासाठी मेट्रोच्या ट्रॅकवर गेल्याने अटक 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोअर ओशिवरा येथील मेट्रोच्या ट्रॅकवर चहा देण्यासाठी गेलेल्या एकाला एमएचबी पोलिसांनी अटक केली. अतिबुल शेख असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून आज न्यायालयात हजर केले होते.

नितीन पवार हे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. गुरुवारी दुपारी ते नेहमीप्रमाणे डय़ुटीवर आले. लोअर ओशिवरा येथील मेट्रो रेल्वे ट्रकवर एक जण चालत असल्याची माहिती पवार यांना सांगण्यात आली. त्यानंतर पवार आणि स्टेशन पंट्रोलर हे लोअर ओशिवरा येथून अंधेरी पश्चिमेकडे जाणाऱया मेट्रो ट्रककडे गेले तेव्हा शेख हा मेट्रोच्या ट्रकवरून चालत होता. पवार यांनी शेखला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली. त्याला ट्रकवर कशासाठी आला याबाबत विचारणा केली. दोन दिवसांपूर्वी त्या ट्रकवर काम सुरू होते तेव्हा तेथे कामगारांना तो चहा देण्यासाठी गेला होता असे त्याने चौकशीत सांगितले. विनापरवाना मेट्रो ट्रक परिसरात आल्याने शेखला ताब्यात घेऊन एमएचबी पोलिसांच्या ताब्यात दिले. पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी शेखविरोधात गुन्हा नोंद करून त्याला अटक केली.