रिक्षा-टॅक्सी चालकांकडून 60 हजारांचा दंड वसूल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिक्षा-टॅक्सीचालकांना भाडेवाढ दिल्यानंतरही मीटर रिकॅलिब्रेशन न करणाऱयांना दंडाचा दणका बसला आहे. मुदत संपल्यानंतर मीटर रिकॅलिब्रेशनसाठी आलेल्या 490 रिक्षा आणि 255 टॅक्सीचालकांकडून 60 हजार रुपयांहून अधिक दंड वसूल केला आहे. परिवहन विभागाने 1 ऑक्टोबर रोजी रिक्षाच्या भाडय़ात दोन रुपयांची तर टॅक्सीच्या भाडय़ात तीन रुपयांची वाढ केली आहे. त्यानुसार त्यांनी आपल्या मीटरमध्ये बदल करण्यासाठी साडेतीन महिन्यांची मुदत दिली होती. तरीही अद्याप 65 हजारहून अधिक रिक्षा-टॅक्सीचालकांनी आपल्या मीटरचे रिकॅलिब्रेशन केलेले नाही.