पंढरपूरला निघालेली भाविकांची ट्रॅव्हल्स उलटली; एक ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी निघालेली मध्य प्रदेशातील भाविकांची खासगी बस उलटून एक महिला ठार झाली असून, 29 जण जखमी आहेत. मंगळवेढा तालुक्यातील येड्राव फाटा येथे आज सकाळी हा अपघात झाला. बसचा चालक मोबाईलवर बोलत असताना हा अपघात झाल्याचा आरोप जखमी भाविकांनी केला आहे.

रामकुमारी भूपनसिंग गुर्जर (कय 68, रा. मध्य प्रदेश) असे मृत्यू झालेल्या वृद्ध महिला भाविकाचे नाव आहे. त्याशिवाय 8 भाविक गंभीर जखमी, तर 29 भाविक किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना सोलापूर शहरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

भारत यात्रेसाठी मध्य प्रदेश येथील भाविकांची खासगी ट्रॅव्हल बस कर्नाटक येथे देवदर्शन करून पंढरपूरकडे निघाली होती. उमदीहून मंगळवेढामार्गे पंढरपूरकडे जाताना येड्राव फाटा येथे चालकाच्या निष्काळजीपणामुळे बस पलटी झाली. बस अतिवेगात होती तसेच चालक मोबाईलवर बोलत होता, असे जखमी भाविकांनी सांगितले. मंगळवेढा ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.