
प्रसिद्ध गायक कैलाश खेर स्टेजवर परफॉर्म करत असताना त्याच्यावर काही तरुणांनी बाटली फेकून हल्ला केला. कर्नाटकातील हंपी महोत्सवादरम्यान हा प्रकार घडला. कैलाश खेर स्टेजवर परफॉर्म करत असतानाच दोन तरुणांनी त्यांना कन्नड गाणे गाण्याचा आग्रह केला. रविवार संध्याकाळी ही घटना घडली. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. तीन दिवस चाललेला हंपी महोत्सव 27 जानेवारीपासून सुरू झाला आहे. विजयनगर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर प्रथमच तेथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. कन्नड गायकांसह बॉलीवूडमधील अरमान मलिक यांनीही गाणी सादर केली.






















































