मैत्रीणीने प्रेयसी बनण्यास दिला नकार, संतापलेल्या तरुणाने 24 कोटींचा केला खटला दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिंगापूरच्या एका तरुणाने एका तरुणीविरोधात न्यायालयात खटला दाखल केला आहे. मैत्रीणीने प्रेयसी बनण्यास  मात्र त्यामागचे कारण जाणून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले आहे. त्यासाठी त्याने एक दोन नव्हे तर 24 कोटींचा खटला ठोकला आहे.

कॅशिगन असे त्या तरुणाचे नाव आहे. त्याची 2016 साली नोरा टॅन नावाच्या तरुणीशी मैत्री झाली होती. नोरा त्याच्यासोबत एखाद्या जोडीदारासारखा वेळ घालवायची मात्र तिच्यासाठी तो एक मित्र होता. तो तिच्याकडून मित्रापलिकडे अपेक्षा करु लागला आणि नोराला ते खटकले. तिने सांगितले अंतर राखून बोलायला सांगितले. तसेच थोडा विचार करायला वेळ मागितला. मात्र कॅशिगन गप्प बसणाऱ्यांपैकी नव्हता. त्याने नोराला एक पत्र लिहीले आणि त्यात मानसिक भावना दुखावल्याचा आरोप केला. द स्ट्रेस टाइम्सच्या वृत्तानुसार, नोरा टॅनकडे यातून बचाव करण्यासाठी दोनच पर्याय होते. एकतर त्याच्यासोबत नाते स्विकारणे आणि नुकसान भरपाई देण्यासाठी तयार राहणे.

मीडिया वृत्तानुसार, नोराने कॅशिगनसोबत समुपदेशाकडे जाऊन त्याच्या डोक्यातील हा विचार बाजूला करणार. मात्र 18 महिन्यांच्या प्रयत्नानंतर अखेर तिने हार पत्करली आणि तिने कॅशइगनसोबत बोलणे बंद केले. त्यामुळे कॅशिगनने तिच्यावर 24 कोटींचा खटला दाखल केला. कॅशिगनने उच्च न्यायालयात दोन खटले दाखल केले. ज्यामध्ये दावा केला आहे की, नोराच्या नकाराने त्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला आहे. ती त्याच्या नैराश्याचे कारण बनली आहे. त्याचा कॅशिगनच्या कामावरही परिणाम झाल्याचे म्हंटले आहे.