
पुण्यातील मोहोळचे विद्यमान आमदार यशवंत विठ्ठल माने यांना सेक्सटोर्शनच्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. एका आरोपीने त्यांना व्हॉट्सअॅपवर अश्लील संदेश पाठवले तसेच अश्लील व्हिडीओ कॉल करून त्यांना भुरळ पाडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्या आरोपीने रेकॉर्ड केलेला व्हिडीओ कॉल माने यांना पाठवून तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्याकडून 1 लाख रुपयांची मागणीही केली. याप्रकरणी आमदार माने यांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी राजस्थानमधील भरतपूर येथून आरोपीला अटक केली आहे.


























































