
मला माझी कुठलीच कलाकृती कधीच आवडली नाही. लोकांना काही आवडल्या, काही नाही, पण नुकत्याच आलेल्या ‘वाळवी’ने मात्र आश्चर्याचा धक्का दिला. ‘वाळवी’ इतकी कौतुकास्पद का ठरली? बी पॉझिटिव्ह हे तर आहेच. मात्र, त्यापेक्षा महत्त्वाचे ङ्खरले बी क्रिटिकल. सांगताहेत, दिग्दर्शक परेश मोकाशी.
पहा, कसे अर्थ बदलतात! दोन वर्षांपूर्वी कोविड काळात एखादा पॉझिटिव्ह असणे याचा किती निगेटिव्ह अर्थ होता! एकूण वैद्यक शास्त्र्ाातले माहीत नाही, पण कलाक्षेत्रात मात्र पॉझिटिव्ह म्हणजे आशावादी, सकारात्मक असाच अर्थ होतो. काम मिळाले नाही, तर नैराश्य येऊ न देणे हेच एक मोङ्गे काम होऊन बसते. माझ्यावर नैराश्याची वेळ आली नाही! का? माझा रक्तगटच बी पॉझिटिव्ह आहे म्हणून असेल, पण मुख्य म्हणजे मी वेळीच स्वतःला ओळखले.
शाळेतल्या नाटकात सगळेच अभिनेते असतात. कॉलेजमध्ये गेल्यावर मात्र जरा गंभीरपणे करायचे हे काम आहे, असे ङ्खसू लागते. एकांकिका स्पर्धांत सगळे जण सगळीच कामे करीत असतात. अभिनयापासून संगीत संयोजन, प्रकाश योजना हे आपण करतोच.
कॉलेज संपत आले, पण मोङ्गे झाल्यावर काय व्हायचे ते ङ्खरत नव्हते. पुढे ‘थिएटर अकादमी’ या संस्थेत प्रवेश झाला आणि नाटकाबरोबर साहित्य, संगीत, चित्रकला, चित्रपट, विशेषतः आंतरराष्ट्रीय चित्रपट यांची गोडी लागली, पण अजून चरितार्थाचे काय? या प्रश्नाकडे माझे दुर्लक्ष होते. 90च्या दशकात आजच्या इतके टीव्ही चॅनेल्स नव्हते. त्यामुळे काम बेताचेच मिळायचे. काही छोटय़ा मोङ्गय़ा भूमिका करत होतो, पण एकूण बोंब होती. जवळपास तिशी गाङ्गली तरी आयुष्याला काहीच दिशा नव्हती आणि अखेर मी तो निर्णय घेतला, अभिनय सोडण्याचा! मी तितका बरा अभिनेता नाही, व्यावसायिकदृष्टय़ा यशस्वी होण्याइतकी माझ्यात चिकाटी नाही हे मी स्वीकारले. हे आत्मपरीक्षण महत्त्वाचे ङ्खरले. पुढच्या नैराश्यातून मी वेळीच सुटका करून घेतली. आपल्याला नक्की कशात गती आहे, ते कळणे महत्त्वाचे.
1999 साली मी माझे पहिले नाटक दिग्दर्शित केले ‘संगीत डेबूच्या मुली’. 60 मिनिटांचे प्रायोगिक नाटक असूनही त्याचे शंभर-दीडशे प्रयोग झाले, वाखाणले गेले. माझ्या मते ङ्खीक होते. पुढे ‘मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी’, ‘लग्नकल्लोळ’, ‘समुद्र’ ही नाटके झाली. विशेष उल्लेखनीय नाही, पण लोकांना आवडली. मी म्हटले, भोगा कर्माची फळे! आता चित्रपटच करतो!
असो, मला माझी कुङ्गलीच कलाकृती कधीच आवडली नाही. लोकांना काही आवडल्या, काही नाही, पण नुकत्याच आलेल्या ‘वाळवी’ने मात्र आश्चर्याचा धक्का दिला. मी पूर्ण समाधानी नाहीच, पण इतक्या मोङ्गय़ा प्रमाणावर माझ्या कलाकृतीचे जनतेकडून काwतुक? या धक्क्यातून सावरायला वेळ लागेल! ‘वाळवी’ इतकी काwतुकास्पद का ङ्खरली? बी पॉझिटिव्ह हे तर आहेच. मात्र, त्यापेक्षा महत्त्वाचे ङ्खरले बी क्रिटिकल. अगदी बी सिनिकलसुद्धा चालेल, पण बी हॅपी – म्हणजे स्वतःचीच कलाकृती आवडणे हे झाले तर पुढे लवकरच ‘बी नडोक’ व्हायला वेळ लागत नाही!
– संकलन ः निनाद पाटील

























































