देवणी येथे व्यापार्‍याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून नऊ लाख पाच हजार रुपये लुटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवणी येथील बसस्थानकासमोरून गुरुवारी रात्री दुकान बंद करून घराकडे जाणार्‍या व्यापार्‍याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून रोख रक्कम नऊ लाख पाच हजार रुपये लुटले. ऐन बाजारात भरवस्तीत व्यापार्‍यास लुटल्याने जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणी देवणी पोलिसांकडून प्राप्त झालेली माहिती अशी की, येथील व्यापारी उमाकांत जगदीश जीवने हे नेहमीप्रमाणे आपले दुकान गुरूवारी रात्री सव्वानऊ वाजता बंद करून पैशाची बॅग घेऊन घराकडे जात होते. त्यांना बसस्थानकासमोरील घराच्या वाटेवर अडवून दोन अज्ञात व्यक्तींनी डोळ्यात मिरचीपूड टाकून त्यांच्या जवळील नऊ लाख पाच हजार रुपये असलेली बॅग हिसकावून पळ काढला.

या प्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तिच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे हे करीत आहेत.