
दहशतवादी प्रशिक्षणासाठी पाकिस्तानात जाण्याचा कट रचणाऱ्या दोघांना दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानात बसलेल्या दहशतवाद्याच्या संपर्कात आल्यानंतर कट्टरतावादाच्या मार्गाला जाण्याची सुरुवात केली होती.
शनिवारी याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, महाराष्ट्रातील ठाणे येथील राहणारा 21 वर्षीय खालिद मुबारक खान आणि तामिळनाडू येथे राहणारा 26 वर्षीय अब्दुल्ला उर्फ अब्दुर रहमान अशी या आरोपींची नावे आहेत. हे दोघेही पाकिस्तानात बसलेल्या मास्टर्ससोबत सोशल मीडियावर संपर्कात येऊन कट्टरपंथाकडे झुकले होते. हे दोघे जण त्यांच्या हँडलरकडून पाकिस्तानची सीमा बेकायदेशीरपणे कशी ओलांडायची याबाबत सूचना घेत होते. त्यांच्या ताब्यातून दोन पिस्तूल, 10 काडतुसे, एक चाकू आणि एक वायर कटर जप्त करण्यात आले आहे.
पाकिस्तानात बसलेल्या दहशतवाद्यांकडून हिंदुस्थानातील काही लोक सोशल मीडियावर कट्टरपंथी बनत असून त्यांना हिंदुस्थानात दहशतवादी हल्ले करण्यापूर्वी पाकिस्तानमध्ये शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण घेण्याच्या सूचना देण्यात आल्याचे या माहितीत सांगण्यात आले.


























































