पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक नाही; नाइट ब्लॉक घेणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम रेल्वेवर रविवारी मगाब्लॉक घेण्यात येणार नाही. मात्र, पश्चिम रेल्वेच्या बोरीवली आणि भाईन्दर स्थानकांदरम्यान रात्रीचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे लाईन, सिग्नलिंग आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी शनिवार, रविवार (4/ 5 मार्च 2023) बोरीवली ते भाईन्दर स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर रात्री 11.45 ते पहाटे 3.45 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. तर डाऊन जलद मार्गावर रात्री 12.45 ते पहाटे 4.45 वाजेपर्यंत ब्लॉक असेल.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. या ब्लॉकच्या काळात विरार, वसई ते बोरीवली दरम्यान जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर चालवण्यात येतील. तसेच काही गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. रात्रीचा ब्लॉक असल्याने रविवारी पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही.