ठाणे टायगर्सचा विजयी चौकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रीराज घरतची 34 धावांची नाबाद खेळी आणि जय धात्रक, सुमित मारकलीच्या प्रत्येकी 3 विकेटच्या जोरावर ठाणे टायगर्सने सानपाडा स्कॉर्पियन्सचा 8 विकेटने लीलया पराभव केला आणि पहिल्या नवी मुंबई प्रीमियर लीगमध्ये सलग चौथा साखळी सामना जिंकला. दादोजी कोंडदेव स्टेडीयमवर ठाणे टायगर्सने नाणेफेक जिंकून सानपाडा संघाला प्रथम फलंदाजी दिली.  ठाणे  टायगर्सच्या जय धात्रक (13/3), सुमित मारकली (14/3), हेमंत बुचडे (10/2) यांच्या अचूक गोलंदाजीमुळे सानपाडय़ाचा डाव 19.4 षटकात केवळ 83 धावसंख्येवर संपुष्टात आला. सलामीवीर साहिल गोडे (23) व श्रीराज घरतच्या (ना. 34) दमदार फलंदाजीमुळे ठाणे टायगर्सने 14 व्या षटकाला 2 बाद 84 अशी विजयी धावसंख्या सहज रचली. जय धात्रक सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.