इंस्टाग्रामवर गुड बाय करत तरुणीने केली आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिक महिला दिनी चंद्रपुरात एका महिलेने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. तिने इन्स्टाग्राम वर स्वतःचा फोटो शेअर करत, माझा शेवटचा फोटो, Good By असं म्हणत तिने गळफास घेत आत्महत्या केली.

गायत्री रामटेके (20) असे त्या मृत मुलीचे नाव असून ती भंडारा जिल्ह्यातील करांडला या गावतील आहे. ती चंद्रपुरातील घुटकाला वार्डात स्पर्धापरीक्षेच्या तयारी साठी भाड्याच्या घरात रहात होती, याच घरात तिने गळफास घेत जीवन संपवलं, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळी पोहोचले. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शहर पोलीस पुढील तपास करत आहे.