
गेल्या तीन्ही कसोटींत चाचपडणारी, धडपडणारी ऑस्ट्रेलियन फलंदाजी अखेर बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत धावांसाठी खेळली. झुंजार आणि धीरोदात्त फलंदाजी करणाऱया उस्मान ख्वाजाने पॅमरून ग्रीनच्या साथीने हिंदुस्थानी गोलंदाजांचा अक्षरशः बाजा वाजवला. ख्वाजाचे पहिलेवहिले द्विशतक अवघ्या 20 धावांनी हुकले तर पॅमरून ग्रीनने आपले पहिलेवहिले शतक साजरे केले. दोघांनी पाचव्या विकेटसाठी केलेल्या 208 धावांच्या झुंजार भागीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात 480 धावांची जबरदस्त धावसंख्या उभारत चौथी कसोटी अडीच दिवसांत संपणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले. दुसऱया दिवसाचा खेळ थांबला तेव्हा हिंदुस्थानने पहिल्या डावात बिनबाद 36 धावा केल्या असून कर्णधार रोहित शर्मा 17 तर शुभमन गिल 18 धावांवर खेळत होते.
पहिल्या दिवसाप्रमाणे दुसरा दिवसही ख्वाजा आणि पॅमरूननेच गाजवला. काल 255 धावा करणाऱया ऑस्ट्रेलियाने दुसऱया दिवशी त्यात 235 धावांची भर घातली. काल या धावसंख्येत ख्वाजा-ग्रीनचा 153 धावांचा वाटा होता तर आज दोघांनी त्यात 141 धावांची भर घातली. काल ख्वाजाने शतक झळकावले होते तर आज ग्रीनने शतक साजरे केले. एवढेच नव्हे तर दोघांनी पाचव्या विकेटसाठी रचलेल्या 208 धावांच्या भागीमुळेच ऑस्ट्रेलियाला इतकी मोठी आणि आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली.
लायन–मर्फीनेही रडवले
ख्वाजा पायचीत झाल्यावर ऑस्ट्रेलियाचा डाव लवकर संपायला हवा होता, पण फलंदाजीच्या सुरात असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या नवव्या आणि दहाव्या क्रमांकाच्या टॉड मर्फी आणि नॅथन लायन या खेळाडूंनीही हिंदुस्थानी गोलंदाजांना रडवले. या तळाच्या फलंदाजांनी तब्बल 19 षटके तोंड देत 70 धावांची अप्रतिम भागी रचली. मग सहा चेंडूंत मर्फी (34) आणि लायन (41) या दोघांना अश्विननेच टिपले आणि ऑस्ट्रेलियाचा डाव 480 धावांवर संपविण्यात यश मिळविले. ऑस्ट्रेलियाने दुसऱया दिवसात तब्बल 78 षटके फलंदाजी केल्यामुळे हिंदुस्थानला 10 षटके फलंदाजी करता आली. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिलने सावध खेळ करीत अभेद्य 36 धावांची सलामी दिली.
अश्विनचा भन्नाट स्पेल
ख्वाजा-ग्रीनच्या द्विशतकी भागीला अश्विनने पूर्णविराम लावला. ग्रीनला बाद करून त्याने आपले दिवसभरातील पहिले यश संपादले. त्यानंतर त्याच षटकात अॅलेक्स पॅरीला भोपळाही पह्डू दिला नाही. निर्धाव षटकात अश्विनने 2 विकेट घेतल्या. मग मिचेल स्टार्कला बाद करून अश्विनने आपल्या फिरकीची ताकद दाखवली. त्याने 15 चेंडूंत अवघ्या 2 धावांत 3 विकेट टिपल्या. पुढे ख्वाजाचाही झुंजार खेळ अक्षर पटेलने संपविला. तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 8 बाद 409 धावा झाल्या होत्या. पण त्यानंतर लायन-मर्फीने झुंजार भागी रचत संघाला 480पर्यंत नेले. या दोघांनाही अश्विननेच टिपत 31व्यांदा डावात पाच विकेट टिपण्याचा कारनामा केला. त्याने 91 धावांत 6 विकेट मिळवल्या. तसेच मायभूमीत 26 वेळा ही किमया साधत त्याने अनिल पुंबळेच्या विक्रमला मागे टाकले. आता तो श्रीलंकेच्या रंगना हेराथसह संयुक्तपणे दुसऱया स्थानावर आहे. मुथय्या मुरलीधरनने मायभूमीत पाच विकेट 45 वेळा टिपत अव्वल स्थान पटकावले आहे. त्याचप्रमाणे अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध हिंदुस्थानकडून सर्वाधिक बळी टिपणाऱया अनिल पुंबळेला (111) मागे टाकले. आता त्याने 113 विकेट मिळविल्या आहेत.
सवादहा तासांची मॅरेथॉन खेळी
ख्वाजाने आजही राजासारखी खेळी केली. तब्बल दहा तास खेळपट्टीवर हिंदुस्थानी गोलंदाजांचा टिच्चून सामना केला. त्याने 422 चेंडूंचा सामना करताना 180 धावांची दीर्घ खेळी केली. तो तब्बल 146 षटके खेळपट्टीवर नांगर टाकून उभा होता. त्याला आपल्या 195 धावांच्या सर्वोच्च कसोटी खेळीला मागे टाकण्याची संधी होती, पण त्याचा संयम सुटला व तो पायचीत झाला अन्यथा त्याने आज आपले पहिलेवहिले द्विशतकही पूर्ण केले असते. मात्र पॅमरून ग्रीनने आपले पहिलेवहिले शतक ठोकण्याचा मान मिळविला. ग्रीनने 143व्या चेंडूवर आपले शतक पूर्ण केले. तो 114 धावांवर बाद झाला, पण त्यापूर्वी त्याने 18 चौकारांची बरसात केली.
पॅट कमिन्सला मातृशोक
आपल्या आईच्या आजारपणामुळे हिंदुस्थान दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतलेल्या कर्णधार पॅट कमिन्सच्या आईचे आज निधन झाले. कमिन्सच्या आईला श्रद्धांजली देण्यासाठी ऑस्ट्रेलियन फलंदाज दंडाला काळी फीत लावून मैदानात उतरले होते.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया (प. डाव) 167. 2 षटकांत सर्व बाद 480 (ट्रव्हिस हेड 32, उस्मान ख्वाजा 180, स्टिव्हन स्मिथ 38, पॅमेरून ग्रीन 114, नॅथन लायन 34, टॉड मर्फी 41; मोहम्मद शमी 31-3-134-2, 47.2- 15-91-6)
हिंदुस्थान (प. डाव) 10 षटकांत बिनबाद 36 (रोहित शर्मा खेळत आहे 17, शुभमन गिल खेळत आहे 18)



























































