आता मी कोणालाही लोणी लावायला जाणार नाही! गडकरींनी स्पष्टच सांगितले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मला समाजकारणात जास्त रस आहे. मी अनेकदा सांगितले की, आता पुष्कळ झाले. लोकांनो, तुम्हाला पटले तर मत द्या, नाहीतर नका देऊ. मी आता फार कोणालाही लोणी लावत बसणार नाही. मी नाही तर माझ्या जागी दुसरा कुणीतरी येईल, असे स्पष्ट मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

वनराई फाऊंडेशनच्या वतीने आयोजित सत्कार सोहळय़ात ते बोलत होते. राजकारण म्हणजे पैसा कमावण्याचा धंदा नाही. राजकारण म्हणजे समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण आणि धर्मकारण आहे. त्यामुळे समाजाची, विशेषतः गोरगरीबांची सेवा राजकारणातून होणे अपेक्षित आहे, असेही गडकरींनी यावेळी सांगितले.

राजकारणातून दूर जाण्याचे संकेत

भाजपच्या संसदीय समितीतून गडकरी यांना काही महिन्यांपूर्वी वगळण्यात आले आहे.  त्यामुळे भाजपच्या शीर्ष नेत्यांकर गडकरी नाराज असल्याचे बोलले जात आहे. नागपूर येथील कार्यक्रमात गडकरी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ते राजकारणातून दूर जाणार असल्याची चर्चा आता रंगली आहे.