
समलैंगिक नात्याबाबत एक अनोखी बातमी समोर आली आहे. दोन नव्हे तर तीन मुलं एकमेकांच्या प्रेमात पडली आहे. तिघं एकमेकांच्या प्रेमात बेभान झाले असून तिघांनी आपले नाते सार्वजनिक केले आहे. शिवाय तिघांना एकमेकांशी लग्न करुन संसार थाटायचा आहे. त्यांच्या नात्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
डेलीमेल च्या वृत्तानुसार, तीन कॅनेडीयन मुलांनी त्यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर उघडपणे चर्चा केली आहे. तिघांनाही एकमेकांशी लग्न करायचे आहे. 27 वर्षीय एडम जोशुआ, 24 वर्षाचा जेके टेलर आणि 30 वर्षीय डेरिक केनेडी हे तिघे एकमेकांच्या वेड्यासारखे प्रेमात आहेत.त्यांचे एवढे एकमेकांवर प्रेम आहे की, ते तिघे एकमेकांशिवाय अलग होऊ शकत नाही. त्यामुळे कायमचे एक होण्यासाठी तिघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांचे लग्न कायद्याच्या दृष्टीने मान्य नाही.
जोशुआ 2016 मध्ये कॅनडाच्या विद्यापिठात शिक्षण घेत असताना त्यांची भेट जेकेसोबत झाली आणि तो त्याला डेट करु लागला. डेटिंगच्या पाच वर्षानंतर त्यांच्या नात्यात ट्विस्ट आला की, 2021 मध्ये डॅरिकही या रोमॅण्टिक नात्यात सहभागी झाला. डेरिक वैंकूवरमध्ये पोलीस विभागात असून त्याला कायदा योग्यरित्या माहित आहे. तरीही तो या ट्रीपल नात्यात आहे. आता डेरिक, जेके आणि जोशुआ यांच्यात रोमॅण्टींक नाते आहे. या तिघांनी मागच्या वर्षी नोव्हेंबर 2022 मध्ये आपले नाते सार्वजनिक केले आहे. तेव्हापासून कायम तिघे सोशल मीडियावर चर्चेत आहेत.


























































