
रामनवमीचा उत्साह देशभरात पाहायला मिळाला. शिर्डीतही श्रीरामनवमी उत्सवानिमित्त लाखो भाविकांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले, तर मंदिर व परिसरात करण्यात आलेल्या फुलांची आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाईने साईभक्तांचे लक्ष वेधून घेतले, तर साईनामाच्या जयघोषाने शिर्डीनगरी दुमदुमली.
शिर्डीत साईबाबांनी सुरू केलेल्या रामनवमी उत्सवाचे 112वे वर्ष असून, येथील रामनवमी उत्सवाचे एक विशेष वेगळेपण आहे. श्रीरामवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी गुरुवारी (दि. 30) रात्रभर मंदिर दर्शनाकरिता खुले असल्यामुळे देशभरासह परदेशातून आलेल्या भाविकांनी ‘श्रीं’च्या समाधीचे दर्शन घेतले.

























































