एकदम टिपटॉप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शिवानी गोंडाळ, मेकअप आर्टिस्ट 

तुमचा जॉब कॉर्पोरेट, सरकारी किंवा खासगी असू दे, अनेक वेळा वेगवेगळ्या मीटिंग अटेंड कराव्या लागतात. वेगवेगळ्या ठिकाणी फिरावे लागते. तिथे आपल्याला नेहमीच सुंदर दिसताना व्यक्तिमत्त्वाची वेगळी छाप सोडायची असते, सांभाळायची असते. काम करत असताना दिवसभर फ्रेश दिसायला कोणाला आवडणार नाही?

आता कितीही चेहरा सुंदर असला किंवा स्किनवर डाग नसले तरी थोडासा हलकासा लाइट मेकअप करून अनेक जण आपले सौंदर्य जास्त खुलवितात. लोकांसमोर आपली एक छान वेगळी इमेज तयार व्हावी म्हणून प्रत्येक जण स्वतःवर नवनवीन प्रयोग करत असतो आणि हे असे करत असतानाच कमीत कमी प्रॉडक्टमध्ये आपण स्वतः कसा मेकअप करू किंवा कमीत कमी प्रॉडक्ट वापरून आपल्या चेहऱयाचे सौंदर्य कसे खुलवू यासाठी प्रयत्न केला जातो.

अनेक वेळा आपल्याला तयार व्हायला वेळ मिळत नाही. अशा वेळेस स्वतःचा किट जवळ असणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण कधीही तयार होऊ शकतो. बऱयाच वेळा काही ठिकाणी काही कॉर्पोरेट सेक्टर्समध्ये काही ड्रेसकोडही असतात. मग अशा ड्रेसकोडवरसुद्धा कशाप्रकारे स्वतःला छान प्रेझेंट करावे, आपला कमीत कमी प्रॉडक्टच्या टूल्सचा किट वापरून तयार व्हायला पाहिजे, हे समजून
घेतले पाहिजे.

 तुम्ही ऑफिसमध्ये शर्ट, ट्राऊझर, टॉप अशा प्रकारचे  कपडे घालणार असाल तर  त्यावर  हलका लाइट मेकअप करावा  आणि त्यासाठी त्याच प्रकारचे मेकअप प्रॉडक्टस् तुम्हाला वापरावे लागतात. ज्याच्यामुळे तुमचा मेकअप खूप भडक दिसणार नाही. कॉटन, लीनन, सिल्क अशा प्रकारच्या साडय़ा नेसून तुम्ही ऑफिस पिंवा मिटींगला जाणार असाल आणि तुम्हाला सॉफ्ट लूक हवा असेल तर मात्र तुम्ही तुमचा मेकअप लाइट ठेवणे जास्त गरजेचे असते. लिपस्टिक ही तुमची फार गडद असता कामा नये. ती न्यूड प्रकारातली असेल तर ती चांगली दिसते.  साडीवर छोटी बिंदी लावूनच सॉफ्ट लूक मिळतो. तसेच ज्वेलरीही त्या प्रकारची लाइट असायला हवी. नाजूक चेन वा डायमंड सेट, छोटे नाजूक कानातले, खडे, मोती तुम्ही त्यावर घालू शकता. अनेक वेळा तुम्हाला
ऑफिसमधून वेगवेगळय़ा पाटर्य़ांसाठीही जावे लागते.  अशा वेळेस  तुम्ही ज्वेलरीचा वेगवेगळय़ा प्रकारे वापर करून थोडा वेगळा लूक निर्माण करू शकता.

अशा प्रकारे योग्य रीतीने तुम्ही तुमचा छोटासा किट बनवून स्वतःला नेहमीच सुंदर आणि रिफ्रेशिंग   ठेवा. थोडक्यात काय तर, लूक ब्युटिफुल अॅण्ड वर्क हार्ड.

कमी साहित्यात करा झटपट मेकअप

  • मेकअप कीटसाठी एक वेगळे लहानसे पॉकेट करा आणि ते तुमच्यासोबत ठेवा. मेकअप करताना कुठल्याही प्रकारचे टूल्स न वापरता फक्त कमीत कमी साहित्यावर मेकअप करू शकता.

प्रथम वेट वाइपने तुमचा चेहरा क्लीन करून घ्या. फेस आणि लीप मॉइश्चरायझ करा, नंतर सनस्क्रीनचा वापर करून त्यावर थोडेसे कन्सिलर लावून तुम्ही पावडर कॉम्पॅक्ट लावू शकता किंवा कन्सिलर लावून तुम्ही बीबी क्रीम किंवा सीसी क्रीमचाही वापर करून त्यावर कॉम्पॅक्ट लावू शकता. तसेच जास्त पिगमेंट असल्यास तुम्ही करेक्टर लावून त्यावर बीबी, सीसी क्रीम किंवा पावडर कॉम्पॅक्टचा वापर करू शकता. या सगळय़ा वस्तू तुम्ही  जास्त काळ टिकणाऱया अशा घ्या, जेणेकरून तुमचा मेकअप लवकर खराब होणार नाही.

  • लिपस्टिक लाँग लास्टिंग असली पाहिजे. एखादा ब्लशर किंवा रुज जर तुम्ही तुमच्या किटमध्ये ठेवलात तर त्याचाच वापर तुम्ही आयशॅडो म्हणून करू शकता. अगदी लाइट रंगाचा आयशॅडो किंवा ब्लशर तुम्ही वापरू शकता. तसेच आयलाइनर म्हणून तुम्ही पेन्सिल किंवा पेनचा वापर करू शकता. जर तुम्हाला सवय असेल तर तुम्ही लिक्विड लाइनरही वापरू शकता. हलकासा चांगल्या पंपनीचा मस्कारा तुम्ही वापरलात तर आणखीन डोळे उठून दिसतील. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही काजळाचाही वापर करू शकता. मात्र हे काजळ स्मजप्रूफ, वॉटरप्रूफ असले पाहिजे.

[email protected]