उन्हाळी सुट्टीनिमित्त देवगड आगारातून जादा गाड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उन्हाळी सुट्टीच्या हंगामा करीता देवगड आगारातून लांब पल्ल्याच्या जादा प्रवासी फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रवासी फेऱ्यांमध्ये देवगड-बेळगाव, देवगड-कुर्ला-नेहरूनगर, देवगड-बोरीवली या प्रवासी फेऱ्यांच्या समावेश असल्याची माहिती स्थानक प्रमुख श्रीकांत सैतावडेकर यांनी दिली आहे.

सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक, विभागीय वाहतूक अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली देवगड आगारातून दिनांक 10 एप्रिल पासून जादा देवगड-बेळगाव प्रवासी फेरी पहाटे 5.30 वा. देवगडहून मार्गस्थ होईल आणि परतीच्या प्रवासाकरिता ही प्रवासी फेरी बेळगाव येथून दु. 1.30 वाजता मार्गस्थ होणार आहे. त्याचबरोबर दि.16 एप्रिल पासून देवगड-कुर्ला-नेहरू नगर ही प्रवासी फेरी ठाणे-भांडुप-घाटकोपर मार्गे कुर्ला या मार्गावर जाण्याकरिता सायंकाळी 4.00.वा. देवगड येथून निघून परतीच्या प्रवासाकरता कुर्ला येथून सायंकाळी 4.30 वाजता निघणार आहे. ही प्रवासी फेरी 16 एप्रिल ते 30 मे या कालावधीत सुरू ठेवण्यात येणार आहे. याबरोबरच 26 एप्रिल ते 30 मे पासून देवगड-बोरिवली या मार्गावर सायंकाळी 4.15 वाजता जादा प्रवासी फेरी सोडण्यात येणार असून ही प्रवासी फेरी सायन-अंधेरी मार्गे बोरिवली या मार्गावरून जाणार आहे व परतीच्या प्रवासाकरिता सायंकाळी 5.00 वाजता बोरिवली येथून देवगडकडे वरील मार्गे मार्गस्थ होणार आहे. या सर्व प्रवासी फेऱ्याचे आगाऊ आरक्षण ऑनलाईन त्याचप्रमाणे आरक्षण खिडकीद्वारे सुरू करण्यात आले आहे. तरी या प्रवासी फेऱ्यांचा प्रवासी वर्गाने फायदा घ्यावा. असे आवाहन आगार व्यवस्थापक निलेश लाड यांनी केले आहे.