
टिव्ही अभिनेत्री हिना खान तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या स्टाईल स्टेटमेण्टसाठीही प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर ती कायम फोटोज आणि व्हिडीओज अपडेट करत असते. तिच्या चाहत्यांना तिचे स्टायलिश लूक पाहायला आवडते. हिनाने नुकतेच इंस्टाग्रामवर काळ्या रंगाच्या शर्टमध्ये फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती फार सुंदर दिसत आहे. फोटोंमध्ये तिने शर्टचे वरचे बटण खोलले आहे. काळे शर्ट, मोकळे केस आणि स्मोकी आयमेकअपने हिना खान कमालीची सुंदर दिसत आहे.



























































