
मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानाच्या खानपानावर दरवर्षाला किमान साडेतीन कोटी रुपये खर्च येणार आहे. ‘वर्षा’वर चहापानी, चमचमीत मिसळ, वडा, चिकन-मटण बिर्याणी आणि स्वीट डिश पुरवण्यासाठी सुखसागर हॉस्पिटॅलिटीला एका वर्षासाठी साडेतीन कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे, तर उपमुख्यमंत्र्यांच्या ‘सागर’ बंगल्यावरील खानपानासाठी दीड कोटी रुपये खर्च येणार आहे. हे पंत्राट दोन वर्षांसाठी आहे. म्हणजे पंत्राटाची रक्कम दुप्पट होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी येणाऱया पाहुण्यांच्या खानपान सेवेसाठी दरवर्षाला पाच कोटी रुपये खर्च येणार आहे. ही खानपान सेवा पुरवण्यासाठी राष्ट्रीय व राज्य स्तरावर निविदा मागवण्यात आल्या होत्या. ‘वर्षा’ निवासस्थानी खानपान सेवा पुरवण्यासाठी सुखसागर हॉस्पिटॅलिटीला साडेतीन कोटी रुपयांचे तर ‘सागर’ निवासस्थानाच्या खानपान सेवेसाठी दीड कोटी रुपयांचे छत्रधारी पॅटरर्सला पंत्राट दिले आहे. 10 एप्रिल 2023 ते 9 एप्रिल 2025 अशा दोन वर्षांसाठी हे पंत्राट दिले आहे. पहिल्या वर्षात ‘वर्षा’ बंगल्यावर साडेतीन कोटी रुपये आणि दुसऱया वर्षात साडेतीन कोटी असे दोन वर्षांसाठी सात कोटी रुपयांचे टेंडर आहे. दोन्ही बंगल्यांचे एक वर्षाचे पाच कोटींचे आणि दोन वर्षांसाठी दहा कोटींचे टेंडर आहे.
चहाचा दर (125 एमएल) 18 रु.
कॉफी(125एमएल) 13 रु.
बटाटावडा (दोन) 27 रु.
चिकन-मटण बिर्याणी 35 रु.
व्हेज थाळी (फुल) 95 रु.
नॉनव्हेज थाळी (फुल) 98 रु.
स्पेशल व्हेज बुफे लंच 325 रु.
स्पेशल ब्रेकफास्ट बुफे 45 रु.
स्पेशल व्हेज बुफे डिनर 160 रु.
स्पेशल नॉनव्हेज बुफे डिनर 160 रु.
123 दिवसांत दोन कोटींचा खर्च
मध्यंतरी आरटीआय कार्यकर्ते नितीन यादव यांनी महितीच्या अधिकाराखाली ‘वर्षा’ निवासस्थानी जेवणावळीवर झालेल्या खर्चाची माहिती मागवली होती. तेव्हा 1 जुलै 2022 ते 31 ऑक्टोबर 2022 या 123 दिवसांच्या कालावधीत 2 कोटी 38 लाख 34 हजार 598 रुपये खर्च झाल्याची अधिकृत आकडेवारी पुढे आली होती. त्याशिवाय शिंदे-फडणवीस सरकारने सात महिन्यांत जाहिरातींवर 42 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती पुढे आली होती.


























































