
बदलेल्या तापमानाचा परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो, त्यामुळे आपली त्वचा तेलकट आणि चिकट होते. मग आपल्याला त्वचेवरील मुरुमांची समस्या निर्माण होण्याची शक्यता असते, त्यामुळे या समस्या असलेले लोक उन्हाळ्यात बाहेर पडताना विशेष काळजी घेत असतात. यासारख्या इतर समस्या दुर करण्यासाठी, हा एक आयुर्वेदिक आणि घरातील पदार्थ वापरून तयार केलेला उपाय, आपल्या त्वचेच्या देखभालीत मदत करेल.
हा फेसपॅक घरगुती असल्याने पूर्ण 100% नैसर्गिक आहे,तसेच याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. यामुळे तुमची त्वचा देखील ताजी आणि तजेलदार राहील. हा फेसपॅक फक्त 10 मिनिटे,चेहऱ्यावर ठेवून नंतर धुऊन टाका. त्यामुळे त्वचा आणि चेहऱ्यावरील सर्व प्रकारच्या समस्या दूर होतील. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग पूर्णपणे कमी होतात. तसेच चेहऱ्याला एक प्रकारची चकाकी येऊन, आपले पिंपल्स पूर्णपणे कमी होण्यास सुरुवात होतात. याशिवाय चेहरा गोरा, तेजस्वी, चमकदार आणि चमकदार बनतो.
केळ्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन असतात व्हिटॅमिन बी 12 आणि 6, हे घटक अत्यंत उपयुक्त असतात. कारण यांच्यामध्ये मृत पेशी कमी होण्यास सुरुवात होते.केळीमध्ये सिलिका हा एक घटक असतो. जो सुरकुत्या व डोळ्याखालील काळे डाग पूर्णपणे काढून टाकतो. त्याचप्रमाणे केळीमध्ये सॅलिसिलिक ऍसिड असते, जे वांगाचे डाग कमी करते आणि चेहऱ्याला एक प्रकारची चमकदार असते.या केळीचे बारीक काप करून घेतल्यावर, यामध्ये जो आपल्याला दुसरा घटक लागणार आहे, ते म्हणजे ग्लिसरीन होय,कारण याचा उपयोग सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरला जातो. हे चेहऱ्यावरील मृतपेशी काढून टाकते,तसेच चेहऱ्यावरील खड्डे भरण्यास मदत करते. असे ग्लिसरीन एक वेळसाठी केळीच्या तुकड्यांमध्ये साधारणत 4 ते 5 थेंब मिक्स करायचे आहे.
ग्लिसरीन मिळाले नाही, तर फक्त केळीचे बारीक केलेले तुकडे वापरून हा फेस पॅक तयार करा. हे मिश्रण पूर्णपणे एकजीव होईपर्यंत फेटून घ्या. आणि चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटं ठेवून कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. तसेच दिवसभरात आपल्याला जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा हा फेसपॅक वापरू शकतात. सलग 15 दिवस हा फेसपॅक तुम्हाला वापरा, यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होतील आणि तुमचा चेहरा तेजस्वी आणि चमकदार बनेल.


























































