
मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा-मुलुंड दरम्यान अप-डाउन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 3.55 यावेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत सुटणाऱया डाउन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. ठाणे येथून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 वाजेपर्यंत अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. दरम्यान जलद मार्गावरील लोकल गाडय़ा धीम्या मार्गानर वळवण्यात येणार असल्याने सर्वच गाडय़ा पंधरा-वीस मिनिटे उशिराने धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत.





























































