
सध्या सुदानमध्ये 3000 हून अधिक हिंदुस्थानी अडकले आहेत. संघर्षग्रस्त सुदानमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी दिंडस्थानने सोमवारी ‘ऑपरेशन कावेरी’ सुरू केले. ‘ऑपरेशन कावेरी’ अंतर्गत, 500 हिंदुस्थानी सुदानच्या बंदरावर पोहोचले आहेत आणि उर्वरित लोकांना सुरक्षित ठिकाणी आणण्याची तयारी सुरू आहे, जेणेकरून त्यांना लवकरात लवकर सुरक्षितपणे आणता येईल. परराष्ट्र मंत्रालयाने माहिती दिली आहे की सुदानमध्ये अडकलेल्या हिंदुस्थानीचा पहिला गट रवाना करण्यात आला आहे, ज्यामध्ये 278 लोकांचा समावेश आहे.
सुदानमधून बाहेर काढण्यात आलेल्या गटात मुलांचा समावेश आहे, जेथे लष्कर आणि निमलष्करी गटामध्ये भीषण लढाई सुरू आहे. ऑपरेशन कावेरीचा भाग म्हणून हिंदुस्थानने दोन वाहतूक विमाने आईएनएस जेद्दाह आणि आईएनएस सुमेधा बंदर सुदान येथे तैनात केली होती

























































