
विनाशकारी प्रकल्पविरोधी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार विनायक राऊत आज आंदोलनात सहभागी होणार होते. मात्र राणतळे येथे पोलिसांनी त्यांना रोखले. या वेळी पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध करीत त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला. यानंतर काही वेळाने राऊत यांची एक गाडी आत सोडण्यात आली. मात्र काही अंतरावर जाताच पोलिसांनी राऊत यांच्यासह सहा जणांना ताब्यात घेतले. यात शिवसेनेचे रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे, जिल्हाप्रमुख विलास साळखे, राजापूर तालुका संपर्क प्रमुख चंद्रप्रकाश नकाशे, राजापूर तालुकाप्रमुख कमलाकर कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य तात्या सरवणकर, विद्याधर पेडणेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेत राजापूर पोलीस ठाण्यात आणले.
View this post on Instagram


























































