
कोकणात सुरू असलेला अमानुष खेळ दिल्लीच्या आदेशाने सुरू आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मॉरिशसला जाताना पोलिसांना आदेश दिले आहेत की, जोर-जबरदस्ती करून सर्वेक्षण करा. कारण दिल्लीतील मोगलांच्या तशा सूचना आहेत, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात, स्थानिकांवर जोर-जबरदस्ती करणार नाही. दुसरीकडे आंदोलकांवर लाठीचार्ज करतात. कदाचित शेतकऱ्यांवर गोळय़ा झाडत बारसूची भूमी रक्ताने भिजवत तुम्ही रिफायनरी उभी कराल, असे राऊत म्हणाले. काहीही झाले तरी रिफायनरी सुरू करण्याचे दिल्लीचे आदेश आहेत. कारण परदेशी कंपन्यांबरोबर दिल्लीवाल्यांनी करार केले असून मोठय़ा प्रमाणावर कमिशनबाजी आहे. त्यामुळे फायदा-तोटा हे गणित लावूनच बारसूत लाठीहल्ला सुरू झाल्याचा आरोपही राऊत यांनी केला.

























































