
बॉलीवूडमधील अभिनेते आशीष विद्यार्थी यांनी वयाच्या 60 व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. त्यांनी रूपाली बरुआ यांच्यासोबत गुरुवारी रजिस्टर्ड मॅरेज केले आहे. रूपाली बरुआ यांचे कोलकाता येथे एक फॅशन स्टोअर आहे. आशीष विद्यार्थी आणि रूपाली बरुआ यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये दोघांच्या गळ्यात हार दिसत आहेत. कलाकारांनी आणि चाहत्यांनी त्यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ‘आयुष्याच्या या टप्प्यावर रूपालीशी लग्न होणे ही एक विलक्षण भावना आहे,’ असे आशीष यांनी म्हटले आहे. रूपालीपूर्वी आशीष यांनी अभिनेत्री राजोशी विद्यार्थीसोबत लग्न केले होते.



























































