
>> वर्षा चोपडे
सत्यवान आणि सावित्रीची कथा सर्वत्र प्रसिद्ध आहे, परंतु सत्यवान-सावित्रीच्या मंदिराबाबत तुम्हाला नक्कीच माहिती नसेल. प्राचीन सत्यवान-सावित्री मंदिर हे हिंदुस्थानी स्त्रियांच्या अस्मितेचे प्रतीक आहे. सत्यवान-सावित्रीची आठवण म्हणून मेष पांतीला बिहार, पटना राणीपूरजवळ वभनगामा येथे दरवर्षी उत्सव साजरा करून वैदिक पद्धतीने पूजा केली जाते.
द रवर्षीप्रमाणे याही वर्षी हिंदू स्त्रिया वटपौर्णिमा मोठय़ा उत्साहाने साजरी करीत आहेत. सत्यवान-सावित्रीची कथा आपल्याला त्याग, बलिदान, प्रेम, भक्ती आणि नि:स्वार्थ आचरण शिकवते. पर्यावरणावर प्रेम करायला शिकवते. कथा सुंदर आहे, पण त्यापासून बोध घेऊन जर आपण आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा आदर आणि सन्मान केला तर आपली पूजा फलदायी ठरेल हेसुद्धा लक्षात घ्या. आचरण शुद्ध असले, बुद्धिचातुर्य असले आणि सतीसारखे पावित्र्य असले तर एखादी स्त्राr मृत्युपाशातून आपल्या पतीला कशी सोडवते हे सावित्री-सत्यवानाची गोष्ट वाचली की, लक्षात येईल.
सत्यवान-सावित्री मंदिर
सत्यवान आणि सावित्रीची कथा सर्वत्र प्रसिद्ध आहे, परंतु सत्यवान-सावित्रीच्या मंदिराबाबत तुम्हाला नक्कीच माहिती नसेल. प्राचीन सत्यवान-सावित्री मंदिर हे हिंदुस्थानी स्त्रियांच्या अस्मितेचे प्रतीक आहे. सत्यवान-सावित्रीची आठवण म्हणून मेष पांतीला बिहार, पटना राणीपूरजवळ वभनगामा येथे दरवर्षी उत्सव साजरा करून वैदिक पद्धतीने पूजा केली जाते. ’सती नारी के सत्य बलवान रे, जिनसें हार गये भगवान रे’ असे म्हणून रात्री नृत्य करून पूजाअर्चना केली जाते. दुसऱया दिवशी पंजर भोंकवा नृत्याने समारोप केला जातो. यात असंख्य भक्त सामील होतात आणि सत्यवान-सावित्रीला नमन करतात.
पारंपरिक कथा अशी आहे की, प्राचीन काळी मद्र देशात (सध्याचे सियालकोट) शाकलवंशी अश्वपती (शिबी राजाचा नातू) नावाचा राजा होता. त्याला अपत्य नव्हते. ब्राह्मणांच्या सांगण्यावरून त्यांनी पुत्रप्राप्तीच्या इच्छेने सर्व इच्छा पूर्ण करणाऱया सावित्रीची (गायत्री) पूजा सुरू केली. काही काळानंतर तिच्या उपासनेने प्रसन्न झालेल्या सावित्रीदेवीने राजाला दर्शन दिले.
सावित्रीदेवी म्हणाली, ‘’राजन, तू माझा नित्य भक्त आहेस म्हणून मीच तुला मुलगी म्हणून लाभेन,” असे म्हणत देवी अदृश्य झाली. त्या राजाला मालवी (मालवा प्रांत, मध्य प्रदेशमधील आदिवासी कन्या) नावाची सद्गुणी पत्नी होती. जेव्हा वेळ आली तेव्हा तिने सावित्रीच्या रूपात एका मुलीला जन्म दिला. तेव्हा राजा ब्राह्मणांना म्हणाला, ”माता सावित्रीने तपश्चर्येद्वारे मला ही मुलगी दिली आहे. म्हणून तिचे नाव सावित्री असेल.” कालांतराने जेव्हा सावित्री एक तरुण स्त्राr झाली, तेव्हा सावित्रीला वर शोधण्यास सांगितले गेले. म्हणून तिने द्युम्तसेनचा मुलगा सत्यवान याला तिचा नवरा म्हणून निवडले. इकडे नारदजींना हे कळताच ते राजा अश्वपतीकडे आले आणि म्हणाले की, “तुझ्या मुलीने वर शोधण्यात मोठी चूक केली आहे. सत्यवान सदाचारी आणि सद्गुणी असला तरी तो अल्पायुषी आहे. एक वर्षानंतर तो मरणार आहे. तुझ्या सावित्रीच्या आयुष्याचा विचार कर, तिला समजून सांग.” नारदजींचे म्हणणे ऐकून राजा दु:खी झाला. त्याने आपल्या मुलीला समजावले, ”मुली, अशा तरुणाशी लग्न करणं योग्य नाही म्हणून तू दुसऱया वराची निवड कर.” यावर सावित्री म्हणाली, “बाबा, आर्य मुली आपला पती एकदाच निवडतात. त्यामुळे आता काहीही झाले तरी मी सत्यवानलाच माझा पती म्हणून स्वीकारेन.” मुलीच्या जिद्दीपुढे आणि हट्टीपणापुढे राजाचे काहीच चालले नाही. यानंतर सावित्री आणि सत्यवान यांचा विवाह झाला. जंगलात राहून खूप त्रास सहन करूनही सावित्री आपली सासू व अंध सासरे द्युम्तसेन आणि पतीच्या सेवेत मग्न होती. नारदजींच्या कथनानुसार जेव्हा पतीच्या मृत्यूची वेळ जवळ आली, तेव्हा सासऱयाची परवानगी घेऊन सावित्रीने तीन रात्री उपवासाचा विधी केला. चौथ्या दिवशी जेव्हा सत्यवान लाकूड, फुले आणि फळे आणण्यासाठी जंगलात निघाला तेव्हा सावित्रीही सासूची परवानगी घेऊन दुःखी मनाने आपल्या पतीसह त्या भयंकर जंगलात गेली. मनात तीव्र वेदना असतानाही तिने ही भीती आपल्या पतीसमोर उघड होऊ दिली नाही.असाच काही वेळ गेल्यावर सत्यवान म्हणाला, ”सावित्री, मी फळे गोळा केली, पण आता इंधनासाठी लाकडाची व्यवस्था नाही म्हणून तू या वटवृक्षाच्या सावलीत बस. मी येतोच.” सावित्री म्हणाली, ‘’ठीक आहे, तुम्ही लवकर या. कारण या घनदाट जंगलात मला भीती वाटते. सावित्रीच्या या म्हणण्यावर सत्यवान तिच्या समोर काही अंतरावर लाकूडतोड करू लागला. लाकूड तोडताना सत्यवानाचे डोके उठले. मग तो वैतागून पत्नीकडे आला आणि म्हणाला, ‘’सावित्री, या मेहनतीमुळे माझे डोके खूप दुखत आहे. असे दिसते की, मी अंधारात प्रवेश करत आहे. यावेळी मला तुझ्या मांडीवर डोके ठेवून झोपायचे आहे,” असे सावित्रीला सांगून सत्यवान तिच्या मांडीवर डोके ठेवून झोपी गेला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. सावित्री अत्यंत व्यथित झाली. तिने यमदूत येताना बघितले तेव्हा तिचे अंग शहारले. यमराजाला अडवून थरथरत्या अंत:करणाने हात जोडून ती म्हणाली, “माझे पती माझे सर्वस्व आहे. कृपया त्यांना पुनर्जीवन द्या. मी तुम्हाला त्यांना घेऊन जाऊ देणार नाही.”
यमराज म्हणाले, ”सावित्री, मागे फिर. मला माहिती आहे, तू पतिव्रता स्त्राr आहेस, पवित्र आहेस, पण मला नियम मोडता यायचा नाही.”
तरीही ती यमदूतामागे चालतच राहिली. सावित्री म्हणाली, ”माझा पती माझा देव आहे. सासूसासरे, आईवडील मला पूजनीय आहेत. माझ्या नवऱयाला जिथे घेऊन जाताय, तिथे मला पण घेऊन जा. नाहीतर मी जीव देईन.”
यमराज हसले आणि म्हणाले, ”मी तुझ्यावर प्रसन्न झालो म्हणून सत्यवानाच्या जीवनाशिवाय दुसरे वरदान माग, उशीर करू नकोस.”
दुःखातही सावित्री म्हणाली, “हे ज्ञानी, दृष्टी गमावलेल्या माझ्या सासऱयांना राज्य आणि दृष्टी द्या.”
यमराज म्हणाले, ”भद्रे, तुझी ही इच्छा पूर्ण होईल. माझ्या मागे लागून माझ्या कामात अडथळे येतील. तुझ्या सासऱयांना दृष्टी प्राप्त झाली आहे, आता तू परत जा.”
सावित्री म्हणाली, ”देवश्रेष्ठा, तुम्हाला धन्यवाद! तुम्ही सत्पुरुष आहात, दयाळू आहात. कृपा करा, माझे सौभाग्य मला परत द्या.”
यमराज म्हणाले, ”विशालक्षी, तुझ्या या सद्गुरू वचनाने, सदाचारामुळे मला आनंद झाला आहे. म्हणून सत्यवानाच्या जीवनाशिवाय दुसरे वरदान माग. उशीर करू नकोस. तुझ्या पतीचे प्राण मात्र मी परत करू शकत नाही.”
सावित्री मनाने खचली नाही. तत्परतेने ती म्हणाली, “प्रभू, मला शंभर भाऊ-बहीण असावेत अशी माझी इच्छा आहे. कृपया ती पूर्ण करा.”
हे ऐकून यमराज सावित्रीला म्हणाले, “सावित्री, ठीक आहे, तुझी ही इच्छादेखील पूर्ण होईल, पण तू परत जा आणि पतीच्या अंतिम संस्कारांची तयारी कर.”
सावित्रीने मनोमन ठरवले, काहीही झाले तरी पतीचे प्राण परत आणायचे. ती निराशेने परत म्हणाली,
”देवा, मला सत्यवानाच्या मुलामुलींची आई व्हायचे आहे. माझी ही इच्छा पूर्ण करा.”
यमराज कंटाळून म्हणाले, “भद्रे, तुझी ही विनंतीही सफल होईल.” यमराज बोलून गेले.
तीव्र दुःखातही हसून सावित्री यमदूताला म्हणाली, ”देवा, पतीशिवाय मी आई कशी होईन? तुम्ही ‘तथास्तु’ म्हणालात. माझ्या पतीला मला परत करा. प्रभू, देवतांमध्ये तुम्ही श्रेष्ठ. तुमच्या आश्रयाला आलेल्या या पतिव्रता स्त्राrला तिचे कुंकू परत करा.” सावित्री हट्टाला पेटली होती. यमाला तिची दया आली.
यमराज म्हणाले, ”सावित्री, तुझ्या स्तुतीने आणि भक्तीने तृप्त होऊन मी तुझ्या पती सत्यवानाला मुक्त करीत आहे. तुझा पती मी तुला परत करीत आहे. सुखाने संसार करा.”
असे बोलून यमराज सत्यवानाला सोडून अंतर्धान पावले.
द्युम्तसेनला राज्य मिळल्यानंतर सावित्री ज्या वाटेने तिथून निघून गेली होती, त्याच वाटेने ती सत्यवानाचा मृतदेह पडलेल्या ठिकाणी परतली. सावित्री काहीही न घडल्यासारखे सत्यवानाला म्हणाली, “स्वामी, सूर्यास्त झाला आहे. चला आश्रमात परत या. मी तुम्हाला तिथली संपूर्ण घटना सविस्तर सांगेन.” असे म्हणत सावित्री पतीसह आश्रमात पोहोचली. सत्यवानाला जिवंत बघून सगळय़ांना आनंद झाला. सगळय़ांनी सावित्रीचे कौतुक केले.
सावित्रीच्या बुद्धिकौशल्यामुळे तिला तिचा पती परत मिळाला, सासऱयांना दृष्टी मिळाली, तिला तिचे राज्य परत मिळाले आणि भावंडे व मुलेही लाभली. यावरून दिसून येते की, स्त्राr जर लक्ष्मीरूपाने घरात आली तर घरात समृद्धी आणि आनंद येतो. तिच्या परोपकारी हुशारीमुळे घराचे नंदनवन होते. अनेकांच्या जीवनात स्त्रिया आनंद निर्माण करू शकतात आणि घराला स्वर्ग बनवू शकतात.




























































