केंद्रीय बोर्डाच्या दहावीच्या पुस्तकातून ‘लोकशाही’ गायब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसचं अॅण्ड ट्रेनिंगने दहावीच्या पाठय़पुस्तकातून घटकांचे नियतकालिक वर्गीकरण, लोकशाही, राजकीय पक्ष (पूर्ण पान), लोकशाहीसमोरील आव्हाने हे भाग काढून टाकले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे एनसीईआरटीने सांगितले.

विज्ञानाच्या पाठय़पुस्तकातून तीन धडे वगळण्यात आले आहे. यात घटकांचे नियतकालिक वर्गीकरण, सोर्स ऑफ एनर्जी, ऊर्जा स्रोत आणि नैसर्गिक संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन हे धडे अभ्यासक्रमातून वगळण्यात आले आहेत. तसेच सोशल स्टडीजच्या पाठय़पुस्तकातून डेमोव्रॅटीक पॉलिटीक्स-1 हा धडा काढला आहेत. या धडय़ात ‘पॉप्युलर स्ट्रगल्स अॅण्ड मुव्हमेंट’, ‘पॉलिटीकल पार्टीज अॅण्ड चॅलेंजेस टू डॉमोव्रॅसी’ हा भाग अभ्यासायला होता. विद्यार्थ्यांनी अकरावी, बारावीमध्ये या पाठाशी संबंधित विषयांची निवड केली तरच ते हा विषय शिकू शकतात.

गरज नसल्याने धडे वगळले!

अभ्यासक्रमातील काही भाग काढून टाकण्याबाबत कारण स्पष्ट करताना एनसीईआरटीने सांगितले की, काठीण्य पातळी, एकसमान माहिती, आजच्या काळात त्या माहितीची गरज नसल्यामुळे हे पाठ अभ्यासक्रमातून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इयत्ता नववीच्या विज्ञानाच्या पाठय़पुस्तकातील ‘आपण आजारी का पडतो’ हा धडाही हटवण्यात आला आहे. या धडय़ातून विद्यार्थ्यांना काही विषाणू आणि हवेतून पसरणाऱ्या आजाराची माहिती मिळत होती.