WTC Final – हिंदुस्थान नव्हे ऑस्ट्रेलियाचेच पारडे जड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकूण 106 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यात ऑस्ट्रेलियाने 44 आणि हिंदुस्थानने 32 सामने जिंकले आहेत. त्याच वेळी, 29 कसोटी सामने अनिर्णित राहिले आणि 1 सामना टाय झाला आहे. ही आकडेवारी पाहून उभय संघात ऑस्ट्रेलियाचे किमान पारडे जड असल्याचे दिसून येते.

हेल्मेट बंधनकारक

या कसोटीदरम्यान क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच तीन नवे नियम अमलात आणले जाणार आहेत. या नव्या नियमानुसार हेल्मेट बंधनकारक असणार आहे.

वेगवान गोलंदाजांचा सामना करताना फलंदाजाला हेल्मेट घालणे बंधनकारक असेल.

विकेटकीपर स्टम्प्सजवळून विकेटकीपिंग करत असेल तर त्याला हेल्मेट घालणे बंधनकारक असेल.

क्षेत्ररक्षक फलंदाजाजवळ क्षेत्ररक्षण करत असेल तर त्याला हेल्मेट घालणे बंधनकारक असेल.

…तर संयुक्त जगज्जेतेपद

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा सामना अनिर्णित राहिला तर दोन्ही संघांना संयुक्त जगज्जेतेपद बहाल केले जाणार आहे. म्हणजेच ट्रॉफी दोन्ही संघांना प्रदान करण्यात येईल. या सामन्यात पावसाची शक्यता असल्यामुळे कसोटीचा सहावा दिवसही ठेवण्यात आला आहे. मात्र हा राखीव दिवस गरज भासल्यास पंच वापरणार आहेत.

गावसकरांच्या संघात ईशानऐवजी भरत

सुनील गावसकर यांनी  7 जूनपासून सुरू होणाऱया जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठी आपला अंतिम 11 खेळाडूंचा संघ निवडला असून त्यात  यष्टिरक्षक म्हणून ईशान किशनऐवजी के. एस. भरतची निवड केली आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठी गावसकरांचा अंतिम संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, के.एस. भरत (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर.