
नांदेडचा अक्षय भालेराव, लातूरचा गिरीधारी तपघाले, अकोल्याची विद्यार्थिनी आणि कल्याणचा मोहित गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ संविधानप्रेमी सकल देशवासीयांचा जातीयवादाच्या विरोधात शुक्रवार, 9 जून रोजी दुपारी 3 वाजता दादर रेल्वे स्थानक (पश्चिम) ते शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असा निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.
अत्याचारपीडितांना न्याय मिळालाच पाहिजे, आरोपींवर कठोर कारवाई करा, गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱया पोलीस अधिकाऱयांना निलंबित करा, समाजमाध्यमावर सावित्रीबाई, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची बदनामी करणाऱयांवर आणि फेक अकाऊंटद्वारे एकवीरा देवीच्या नावाने तणाव वाढविणाऱयांवर कारवाई करावी, वाढत्या जातीय अत्याचारास जबाबदार असणाऱया गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा या मागण्या यावेळी राज्य सरकारकडे करण्यात येणार आहेत.
























































