विद्यार्थ्यांना गणवेश देण्याच्या निर्णयावरून सरकारची माघार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

येत्या शैक्षणिक वर्षासाठी राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्काऊट व गाईड विषयासाठी एकसमान गणवेश देण्याच्या निर्णयावरून सरकारने माघार घेतली आहे. हा गणवेश सरकार नव्हे, तर शाळा व्यवस्थापन समित्यांकडून दिला जाणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून सरकारकडून महिला बचत गटांमार्फत शिलाई करून गणवेश उपलब्ध करून दिला जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा आदेश गुरुवारी जारी केला आहे.