उद्या मुंबईत डॉक्टर दिंडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माऊली चॅरिटेबल अॅण्ड मेडिकल ट्रस्ट आणि सहकारी वैदकीय व सामाजिक संस्था यांच्या वतीने 11 जून रोजी सकाळी 9 वाजता दादर पश्चिम येथील श्री स्वामी समर्थ महाराज मठ येथून मुंबई ते आळंदी ते पंढरपूर डॉक्टर दिंडी तसेच श्री स्वामी समर्थ पादुका दिंडी प्रस्थान सोहळा होणार आहे.

वारीनिमित्त दिवसरात्र पायी चालणारे लाखो वारकरी माऊली यांना होणाऱया विविध आजारांवर उपचार करताना उच्च प्रतीची औषधे व मोफत वैद्यकीय सेवा देण्यात येणार आहे. संस्थेचा हा सलग 31 वा आषाढी वारी प्रस्थान सोहळा असून शेकडो डॉक्टर, मेडिकल स्टाफ, स्वयंसेवक यात सहभागी होणार आहेत.

सकाळी 8 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी व श्री स्वामी समर्थ महाराजा यांच्या पादुका पूजन, सकाळी 9 वाजता श्री वारकरी संप्रदाय यांचा हरिनाम जागर करून सकाळी 9.30 वाजता ही डॉक्टर दिंडी निघणार आहे. सकाळी 10 ते 11 या वेळेत महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले आहे.