
>>अशोक डुंबरे
ग्रामीण भागातील लोकांसाठी ‘गावरहाटी’ या नावाचा कार्पाम सुरू केला होता. त्यामध्ये ग्रामीण भागाशी निगडित विषयांची निवड केली जायची. 2 ऑक्टोबर 1973 पासून खास शेतकऱयांसाठी आठवडय़ातून दोन वेळा 7.30 ते 8.00 दरम्यान एक कार्यक्रम प्रक्षेपित होऊ लागला… आणि “आमची माती आमची माणसं” या कार्पामाची सुरुवात झाली.
मुंबई दूरदर्शन केंद्र 2 ऑक्टोबर 1972 साली सुरू झालं. त्यावेळी मंडी हाऊस, नवी दिल्ली येथील टीटीसी म्हणजेच ट्रेनिंग सेंटरमधून कार्पाम आणि अभियांत्रिकी विभागातील अनेक कर्मचारी आपलं प्रशिक्षण घेऊन मुंबईमध्ये रुजू झाले होते. मंडी हाऊस येथे प्रशिक्षण देण्यासाठी बीबीसीचे आणि एआयबीडीची तज्ञ मंडळी हे कार्य पार पाडण्यासाठी उपलब्ध होती. मी 1972 मध्ये जून ते डिसेंबर या कालावधीत मंडी हाऊसमध्ये दूरदर्शनचे प्रशिक्षण पूर्ण केले. माझ्याबरोबर आकाशानंद ऊर्फ ए. बी. देशपांडे, मनोहर पिंगळे, सुहासिनी मुळगावकर तसेच मीना वैष्णवी, अशोक वैष्णवी आदी मान्यवर सहकारी होते. सोबत सुमन बजाज, आल्हाद धर्माधिकारी हेही होते. यशवंत कडोलकर हा कॅमेरामॅन म्हणून तसंच चंद्रशेखर कामुलकर संकलक म्हणून यांनी आमच्याबरोबर सहा महिन्यांचं प्रशिक्षण दिल्लीत पूर्ण केलं.
1 जानेवारी 1973 ला आम्ही मुंबई केंद्रात हजर झालो. मुंबई केंद्राची जुनी इमारत होती. एक मोठा स्टुडिओ आणि दोन छोटे स्टुडिओ तयार झालेले होते. मी पहिल्या मजल्यावर कोपऱयातल्या खोलीत बसत असे. त्या खोलीत आधी आर. एस. सावदेकर, वा. रा. सराफ, केशव केळकर, के. डी. जोशी हे प्रोग्रॅम एक्झिक्युटिव म्हणून बसत होते. मधुकर लेले हे सेंटर फिल्म्स पूलचे इन्चार्ज होते. मुंबई केंद्राचे संचालक म्हणून पी. व्ही. कृष्णमूर्ती होते. ते पी. व्ही. के. या नावाने सुपरिचित होते. त्यांचा संगीताचा व्यासंग दांडगा होता. तसंच ग्रामीण कार्पामांमध्ये त्यांना खूपच रुची होती. मी आकाशवाणीमध्ये असताना 1965 ते 70 या काळात पी. व्ही. के. जॉईन डायरेक्टर फार्म अँड होम, नवी दिल्ली येथे कार्यरत होते. त्यामुळे त्यांचा आणि माझा चांगला परिचय होता. तसंच अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख कृष्णमूर्ती हे साऊथ इंडियन सद्गृहस्थ कार्यरत होते. सुरुवातीला तीन ते चार तासाचा कार्पाम असायचा. तो हिंदी, मराठी, गुजराती अशा तीन भाषेमध्ये चालू होता. वृत्त विभाग हा वेगळा विभाग कार्यरत होता. त्यामध्ये डॉ. गोविंद गुंठे तसंच डॉ. विश्वास मेहेंदळे काम करत होते. अरुण श्रॉफ हे गुजराती आणि हिंदी विभागाचे असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम पाहत होते. ल. गो. भागवत साहेब मराठी विभागाचे असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम पाहात होते. 1972 साली ग्रामीण भागातील लोकांसाठी ‘गावरहाटी’ या नावाचा कार्पाम सुरू केला होता. त्यामध्ये ग्रामीण भागाशी निगडित विषयांची निवड केली जायची. सुरुवातीला वा. रा. सराफांकडे निर्मिती होती. 2 आक्टोबर 1973 साली पुणे दूरदर्शन प्रक्षेपण केंद्राची सुरुवात झाली. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात मोठय़ा थाटामाटात उद्घाटन सोहळा पार पडला. प्रमुख पाहुणे केंद्रीय मंत्री कै. यशवंतराव चव्हाण उपस्थित होते. 2 ऑक्टोबर 1973 पासून ‘आमची माती आमची माणसं’ हा शेतकऱयांसाठी आठवडय़ातून दोन वेळा म्हणजे मंगळवार आणि पावार या दिवशी 7.30 ते 8.00 दरम्यान प्रक्षेपित होऊ लागला. अर्थात ‘आमची माती आमची माणसं’ या विभागाचा मी निर्माता म्हणून काम पाहू लागलो. प्रत्येक निर्मात्याला किंवा कार्पाम अधिकाऱयाला एक सहाय्यक म्हणजे प्रोडक्शन असिस्टंट दिमतीला होता. सुरुवातीला बरेचसे कार्पाम स्टुडिओ बेस होत होते. परंतु ‘आमची माती आमची माणसं’ हा कार्पाम प्रत्यक्ष शेतावर जाऊन करावा अशी धारणा पी. व्ही. कृष्णमूर्ती यांची होती.
कार्पामाच्या आधी तीन महिन्यांचं शेडय़ुल म्हणजेच कार्पाम पत्रिका निर्मात्याला तयार करावी लागत असे. त्याची मंजुरी घ्यावी लागत असे. मुंबई दूरदर्शन केंद्रात बरेचसे कार्पामाधिकारी पूर्वाश्रमीचे आकाशवाणीतीले कर्मचारी होते. पूर्वीच्या काळी टॅक्सी किंवा ट्रान्सपोर्ट मिळणं कठीण होतं. मला आठवतंय की, पहिला कार्पाम खोपोली येथे भात संशोधन केंद्रावर जाऊन केला. मी आणि यशवंत कडोलकर मिळून मुंबई ते कर्जत, नंतर कर्जत ते खोपोली असा रेल्वेने प्रवास केला. त्यावेळी गाडीवर सामान असायचे. कॅमेरा, कॅमेरा बॉक्स, स्टॅन्ड, फिल्म चेंजिंग बॅग हे सर्व बरोबर न्यावे लागत असे. शंभर फुटाचा रोल किंवा फोर हंड्रेड मॅगझिन इन लोड करून शूटिंग करावं लागत असे. पहिल्या कार्पामाला आमच्याबरोबर साऊंड रेकॉर्डिस्ट नव्हता. पहिला प्रवास फार खडतर झाला आणि एकदाचे खोपोली फार्मला पोहोचलो. तेथे भाताच्या विविध प्रकारच्या जाती तयार होत होत्या. त्यावर आधारित कार्पाम केला आणि दोन दिवसांनी मुंबईला परत आलो. फिल्म प्रोसेसिंगसाठी मुंबईला वरळीला लॅब होती. त्यामध्ये प्रोसेसिंग होऊन फिल्मचे डबे निर्मात्याच्या हातात मिळायचे. नंतर एडिटरच्या साह्याने आपण त्याच्याबरोबर बसून ही फिल्म एडिट करायची. नंतर त्याला निवेदन व म्युझिक जोडायचं आणि मग तो कार्पाम तयार व्हायचा. सुरुवातीला सवय नव्हती. परंतु हळूहळू सवय झाली आणि कामांमध्ये सुधारणा होत गेली. तीस मिनिटांचा कार्पाम करण्याऐवजी 15-15 मिनिटांचे दोन कार्पाम सुरुवातीला करायचे ठरलं. त्याप्रमाणे सुरुवात झाली. ग्राफिक विभागातून कार्पामाला लागणारे सर्व कॅप्शन किंवा व्हिज्युअल्स तयार करून घ्यायचे आणि त्याचा उपयोग प्रक्षेपण करताना करून घ्यायचा. सुरुवातीला खूपच तारांबळ उडाली, कारण कोणालाच अनुभव नव्हता. माणूस अनुभवातून शिकत जातो. तसतसं त्याच्यात सुधारणा होते आणि मनाला एक प्रकारचं समाधान मिळतं. फिल्मचं एडिटिंग करताना सेपरेट मॅग्नेटिक ट्रक असा एक साऊंड ट्रक तयार करायचा असतो. हा मॅग्नेटिक ट्रक जर्मनी वरून येत असे. त्याच्यावर ट्रान्सफर करण्यासाठी साऊंड विभागाचा नागरा किंवा उव्हर रेकॉर्डर लागायचा. त्याच्यावर कॉमेंट्री रेकॉर्ड करून मॅग्नेट ट्रकवर ट्रान्सफर करून एडिटरच्या साह्याने हा कार्पाम पूर्ण व्हायचा. मग एडिटर ही कॉमेंट्री व्हिज्युअलबरोबर मॅच करायचा. हे काम सुरुवातीला करत गेल्यावर हळूहळू कामांमध्ये सफाई येऊ लागली. अशा प्रकारे सात आठ तास एडिटिंग केल्यानंतर कार्पाम तयार व्हायचा.
पहिला कार्पाम प्रक्षेपित झाला तेव्हाचा तो आनंद फार वेगळा होता. कडोलकर यांची फोटोग्राफी अतिशय सुंदर होती. त्यामुळे हा कार्पाम भाताच्या विविध जातींवर फारच सुंदर झाला आणि “आमची माती आमची माणसं” या कार्पामाची सुरुवात झाली.
(लेखक माजी दूरदर्शन निर्माते आहेत)





























































