
नगर शहरातील मुकुंदनगर येथील मिरवणुकीत औरंगजेबाचे पोस्टर झळकाविल्याच्या निषेधार्थ आज भिंगार गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळपासून गाव पूर्ण बंद होते, तर पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता. बंद शांततेत पार पडला.
नगरमध्ये मुकुंदनगर येथील मिरवणुकीत औरंगजेबाचे पोस्टर झळकविल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी आज ‘भिंगार बंद’ची हाक दिली होती. आज सकाळपासून गावातील सर्व व्यवहार कडकडीत बंद होते. दुकाने सकाळपासूनच बंद होती. बंदच्या पार्श्वभूमीवर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यासह शहरातील पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता. गेल्या आठवडय़ापासून नगर शहरासह जिह्यात औरंगजेबाच्या उदात्तीकरणाचे प्रकार घडत आहेत. या घटनांचा निषेध व ‘लव्ह जिहाद’सारख्या प्रकारावर कडक कायदा करावा, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली होती. या पार्श्वभूमीवर भिंगार गाव बंद ठेवण्यात आले.
























































